पप्पा तुम्ही ही काळजी घ्या, आम्ही तुमची वाट पाहतो...
तळोदा : (सुधाकर मराठे)गभरात कोरोणा विरुद्ध लढणाऱ्या कोरोना योद्धांच्या कहाणी आपण विविध माध्यमातून पाहत व ऐकत आहोत.आज आपल्या तळोदा तालुक्यासह जिल्ह्यात एकही कोरोणा चा रुग्ण आढळून आला नसला तरी कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक योद्धा प्रशासकीय पातळीवर काम करत आहेत.यांतील सर्वात धडाधीचे व अहोरात्र मेहनत करून परिस्थितीवर नजर ठेवून असणारे कोरोना योद्धा म्हणजे तळोदा तालुक्याचे तालूका वैद्यकीय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण हे होत.
मागील महिन्याभरापासून डॉ चव्हाण तालुक्यातील कोरोना संकट उदभवू नये म्हणून व उदभवल्यास करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे नियोजन करत आहेत.प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयकाची भूमिका ते पार पाडत आहेत.
मागील २० ते २५ दिवसांपासून डॉ चव्हाण हे सातत्याने घराबाहेरच राहत असून सर्व परिस्थिती हाताळत आहेत.ही परिस्थिती हाताळत असतांना खबरदारी म्हणून दुपारचे जेवण ते घराच्या बाहेरच पोर्च मध्ये करतात, शिवाय रात्री उशिरा घरी पोहचल्यावर घराबाहेर उघड्यावर आंघोळ करून नंतर ते घरात प्रवेश करतात.रात्री उशिरा घरी पोहचत असल्याने त्यांच्या लहान मुलांना वेळ देणे देखील दुरापास्त झाले आहे.
आपले पप्पा एवढी धावपळ नेमकी का व कश्यासाठी करत आहेत हे कळणे त्या चुमुकल्याना जरी अवघड असले तरी आपल्या पप्पांनी या धावपळीत स्वतःची काळजी घ्यावी, अशी त्यांची भावना आहे. याच भावनेला या चिमुकल्यानी आज वाट करून दिली. डॉ.महेंद्र चव्हाण हे सायंकाळी घरी परतल्यानंतर सहा वर्षाचा मुलगा वेद व त्यांच्या एका वर्षाची मुलगी अन्वि हे त्यांना घरी परतल्यावर सेनेटायझर व साबण देतानाना एक भावनिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याबाबत डॉ चव्हाण यांच्याशी "तळोदा एक्सप्रेसने संपर्क साधला असता ते दररोज घराबाहेर पडतांना, "पप्पा तुम्हीही स्वतःची काळजी घ्या लवकर घरी परता, आम्ही तुमची वाट पाहू" असे सांगत असल्याचे सांगितले.
एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज असताना देशातील डॉक्टर यात सगळ्यात पुढे राहून दोन हात करत आहेत. त्यामुळे सर्वच डॉक्टर्सना ‘तळोदा एक्सप्रेस व मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदर्श सलाम, नागरिकांनी देखील डॉक्टरांचे त्याग व समर्पण लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने सरकारच्या निर्देशांचे पालन करावे व घरात थांबावे असे तळोदा एक्सप्रेसच्या तळोदा वासीयांना नम्र आवाहन ....
admirable...👍💐
ReplyDelete