माजी आमदारांनी स्वतःचे हॉटेल प्रशासन साठी केले खुले

तळोदा:- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील 50 रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील सहमती पत्र जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना दिले.
              श्री.चौधरी यांनी  यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भेाजनाची सेवा करण्याचीदेखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धन्यवाद देताना जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त केले. कोविड-19 संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे श्री.चौधरी यांनी यावेळी सांगितले.

पीएम केअर निधीला 25 हजार रुपये
श्री.गजानन फायबर प्रा.लि. कडून पीएम केअर निधीसाठी 25 हजाराचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिरीष चौधरी, अशोककुमार वसंतलाल,  सतीश चौधरी, योगेश चौधरी, गजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
   साभार जी,मा, का,

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी