डॉ वाणींच्या प्रयत्नातून जळगावला अडकलेल्या विद्यार्थिनांना जीवनावश्यक वस्तू


 

तळोदा : शिक्षणासाठी जळगांव येथे असणाऱ्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थींना भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांच्या प्रयत्नातून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आले.
     लॉकडाऊनमुळे शिक्षणासाठी जळगांव येथे राहत असणाऱ्या तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ,धडगाव तालुक्यातील मनवानी व अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथिल तीन विद्यार्थिनीं अडकून पडल्या होत्या.त्यांच्याकडील समिधा व पैसे संपल्यावर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या विद्यार्थिनींनी मदतीसाठी शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क केला. ही बाब आमदार पाडवी यांनी डॉ वाणी यांना कळवून या विद्यार्थिनींची व्यवस्था करण्याचे सांगितले.
       डॉ वाणी यांनी ह्या बाबत भाजपचे संघटन मंत्री किशोरजी काळकर यांना सविस्तर माहिती दिली.त्यानंतर जळगांवचे आमदार राजूमामा भोळे यांनी या विद्यार्थिनींना महिनाभर पुरेल एवढा किराणा उपलब्ध करून दिला.त्यात गहू,तांदूळ,दाळ,साखर,तेल, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश होता.
          कोरोनामुळे जेव्हापासून लॉकडाऊन करण्यात आले तेव्हा पासून डॉ वाणी हे तळागाळातील हातावर पोट असणाऱ्या मंजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.तळोदा शहरासह ग्रामीण भागातही त्यांनी जीवनावश्यक वस्तू गरजूंना उपलब्ध करून दिल्या आहेत .आता तर थेट त्यांनी जळगांव येथे वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना मदत पुरवून  सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी