तळीरामाना आवर घालण्यासाठी पोलीस नेमण्याची मागणी

तळोदा:-(कालीचरण सूर्यवंशी) देशभरात कोरोनाचे वाढणारे रुग्ण आणि निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता ४ मे ते १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी विभागणी राज्य सरकारने केली आहे. तसेच या तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यात काही सवलती राज्यसरकारने दिल्या आहेत. यात रेड झोनमधील कंटेन्मेंट झोन वगळता दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी त्यांचा सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवर दिली. सदर माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात वाइन विक्री करताना सोशल डिस्टन्स राखून विक्री करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. सदर वृत्त तळीरामाना दिलासादायक ठरले असून अनेकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच वाईन मालकांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र 40 दिवसापासून बंद असलेल्या वाईंनच्या दुकानी अचानक सुरू होणार असल्याने तळीरामाची गर्दी उसळेल याचा अंदाजा विक्रेत्यांनी घेतला असून पूर्व उपाययोजना व नियोजन म्हणून सायंकाळीच वाईन शॉप समोर 6 फूट अंतर ठेव चुन्याच्या सहाय...