धनपूर येथे डेंग्यू सदृश रुग्ण सापडला; प्रशासन सज्ज

तळोदा: (सुधाकर मराठे)तालुक्यातील धनपूर येथील 28 वर्षीय युवक डेंग्यू सदृश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत मार्फत सतर्कता बाळगण्यात आली असून गावात धुरळणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत असून गावातून 10 रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. धनपूर येथील 28 वर्षीय युवकास गेल्या चार पाच दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू लागल्याने त्याला प्रतापपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखविण्यात आले. दरम्यान याठिकाणी विविध तपासण्या केल्यानंतर तो युवक डेंग्यू सदृश असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान धनपूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग विभागा सतर्क आहे, अपुरे मनुष्यबळ असले तरी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेवेकऱ्यासमोर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तालुका आरोग्य विभागाकडून धनपूर गावात जलद ताप सर्वे...