निसर्ग चक्रीवाडळाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार ; ना.के.सी.पाडवी
तळोदा:- निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई बाबत जे निकष शासनाकडून लावण्यात आले होते. तेच निकष शहादा तळोदा तालुक्यात आलेले वादळ हे चक्री वादळाप्रमाणेच असल्याने यात सुमारे 500 कोटी रुपयांचे घर पडझड, जनावरे, शेती पिकांचे नुकसान, विद्युत विभागाचे उपकेंद्राचे नुकसान झाले असल्याचे मत आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी झाल्यावर त्यांनी तळोदा विश्राम गृहात भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. शहरासह ग्रामीण भागात काल (१२ जून) सायंकाळच्या सुमारास चक्री वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळ सुमारे 350 घरांचे नुकसान झाले असून सुमारे 200 झाडे या वादळामुळे कोलमडून पडले असून पत्रे उडणे, विद्युत पोल पडणे, भिंती कोसळणे आदी नुकसान झाले आहे तर 39 गावे या वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसणीतून बचावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील बोरद, खरवड, मोड, खेडले, धानोरा, आमलाड आदी गावातील घरांची पत्रे...