तळोद्यात यूनानी मेडिकल तपासणी कैम्पचे आयोजन

तळोदा येथे मंसुरी पंच जमात सामाजिक संस्था यांच्या मार्फ़त यूनानी मेडिकल तपासणी कैम्पचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लोकांमध्ये या महामारीच्या रोगविषयी भीती कमी व्हावी या हेतुने यूनानी मेडिकल तपासणी कैम्प चे आयोजन केले आहे. या कैम्प मध्ये मालेगांव येथील यूनानी डॉक्टर चे पथक बोलविले असून सोबत यूनानी चे औषधे सोबत काढ़ा देण्यात येत आहे. आज या कैम्प चे उद्धघाटन शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार श्री राजेश पाडवी, तळोदा नगर परिषदचे नगराध्यक्ष श्री अजय भैया परदेशी, श्री.योगेश चौधरी,निसार मकरानी,शेख इक़बाल, नंदू जोहरी,जामा मशीद चे इमाम मौलाना शोएब राजा नूरी, दोंडायचा नगर परिषद चे माजी शिक्षण सभापती नाजिम भाई शेख,डॉ अब्दुल वाहिद,डॉ आमेर मलिक,डॉ ऐतशाम शेख,डॉ फैजान शेख,उपस्थित होते. सदर कैम्प हा पुढील दोन दिवस सुरु राहणार असून त्याचा लाभ जामा मस्जिद परिसर नॅशनल हायस्कूल जवळ तळोदा येथे सर्व समाजाच्या लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंसुरी पंच जमात सामाजिक विकास संस्था चे अध्यक्ष श्री जावीद मंसुरी यांनी केले आहे. या कार्यक्रमस संस्थेचे सर्...