कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेकडून एक दिवसाच्या पगार मुख्यमंत्री सहायता निधीत
तळोदा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने कोराणाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी स्वेच्छेने एक दिवसाच्या पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना या जागतिक संकटाने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. या महाभयंकर आजारामुळे महाराष्ट्र लॉकडाऊन झालेला आहे. अशा वेळी महाराष्ट्रात हातावर कमवणारे अनेक आहेत.त्यांचे पोट रोजंदारीवर आहे.अशा सामान्य वर्गाला रोजच्या अनेक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.या सर्व समस्यांची एक कुटुंब प्रमुख म्हणून शासनाने मार्ग काढलाच पण सोबतच महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून आमचे ही काही उत्तरदायित्व आहे. या भूमिकेतून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेले सर्व कर्मचारी एक दिवसाच्या पगार स्वेच्छेने या कोरणासारख्या युद्धाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यास तयार...