Posts

Showing posts from 2026

इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

Image
प्रतिनिधी तळोदा :-- इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराची विद्यार्थिनी योगिनी सुनील परदेशी हिने इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून तब्बल ६००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३५०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भाग घेतला. यातून २५ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.  या अंतिम टप्प्यात आपल्या ज्ञान, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर योगिनीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे सायकल हे बक्षीस जिंकुन शाळेचा तसेच तळोदा शहराचा गौरव वाढविला. योगिनी ही इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तिला शाळेतील शिक्षक रवींद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री निखिलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया,उपाध्यक्ष श्री दगेसिंग मह...

तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज; बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त

Image
प्रतिनिधी तळोदा :-- तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज;  बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खत व बियाणे वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. खत व बियाण्यांची साठेबाजी, काळाबाजार तसेच निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री रोखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.        ही पथके विक्री केंद्रे, गोदामे आणि साठा ठिकाणांवर अचानक तपासणी करून उपलब्ध साठा, विक्री नोंदी आणि दरांची पडताळणी करणार आहेत. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करणे, पावती घेणे, सरलबंद पाकीट तपासणे, वजन व किमतीची खात्री करणे तसेच खरेदीचे नमुने व टॅग जपून ठेवणे आवश्य...

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

Image
प्रतिनिधी तळोदा :-- मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत  बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली.      यावेळी बाल सुरक्षा आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्रीम.गितांजली बालाजी बुटी,शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई,  प्रवीण संजाबराव भुजाडे,श्रीम. मिलन देवेंद्र जंगम हे उपस्थित होते. यांनी देखिल यावेळी आपल्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी याप्रसंगी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष ॲड संजय पुराणिक व अन्य सदस्याचे स्वागत केले.         बालकांचे हक्क हे केवळ कायद्यापुरते मर्यादित नसून ते समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक...

संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Image
प्रतिनिधी:--( किरण पाटील तळोदा) संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतकीय जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला संसदरत्न माजी खासदार डॉ. हीनाताई गावित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सामाजिक एकात्मतेचा आणि प्रेरणेचा संदेश दिला. या प्रसंगी माळी समाज अध्यक्ष तथा नगरसेवक आनंदा माळी, उपाध्यक्ष किसन माळी, नगरपालिका विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक लक्ष्मण माळी, सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी, संभाजी माळी, पप्पू कुरेशी यांच्यासह माळी समाजातील मोठ्या संख्येने बांधव व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना डॉ. हीनाताई गावित यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातही महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी दिलेला लढा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली.

Image
प्रतिनिधी तळोदा :--(किरण पाटील)  विकासकामांना चालना मिळावी आणि त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहराच्या विविध मूलभूत सुविधा आणि विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळोदा नगरपालिकेला विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) तळोद्यात घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेत शहरातील विकास कामांसंदर्भात चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती दिली. तसेच तळोदा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आधुनिक सोयीसुविधांची गरज असल्याचे त्यांनी याव...

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
प्रतिनिधी तळोदा:--(किरण पाटील) शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन  शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय येथे शहिदी समागम निमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी मा. शेखर धनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व गुरु तेग बहादुर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तब्बल ३० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच निबंध स्पर्धेलाही विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनींनी शहिदी समागमाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमास देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनदादा पवार, समन्वयक निमेश सूर्यवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे , तसेच संचालक महेश मगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शेखर ध...

तळोदा तालुक्यातील रांझणी आश्रम शाळेत मातृ पूजन उत्सावात

Image
प्रतिनिधी तळोदा :--(किरण पाटील) रांझनी आश्रमशाळेत मातृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न     श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मातृ पितृ पूजन कार्यक्रम संपन्न झाला....     कै नानासाहेब जगन्नाथ त्रंबक वाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांझनी येथे शाळेतील विद्यार्थ्यांचा मातृ पितृ पूजन करून पालकांन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची पूजा केली... यावेळी अध्यक्षतस्थानी संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मानद सचिव सी एम पाटील होते... यावेळी विध्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले..यावेळी प्राथमिक मुख्यध्यापक भाऊसाहेब कुवर, माध्यमिक मुख्यध्यापक शालिग्राम वाणी तसेच शिक्षक भूषण येवले,राजेश पाडवी यांनी आई वडीलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या..प्राथमिक शिक्षक धनंजय मराठे यांनी आई बद्दल गाणे म्हंटले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश रामोळे तर आभार प्रदर्शन दिपक मालपुरे यांनी केले..कार्यक्रम यशस्वी संचालनासाठी मनोज चिंचोले,रामकृष्ण शिंदे, महेश सैंदाने, गणपत वळवी, स्वाम...

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

Image
प्रतिनिधी तळोदा:-- (किरण पाटील) तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी  विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अजेंड्यावरील ३७ पैकी ३६ विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर  विरोधकांनकडून सत्ताधाऱ्यांना सहकार्याची भूमिका पहिल्या सभेत दिसून आली.             तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षा नंतर तळोदा येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली  आज घेण्यात आली.या सभेला उपनगराध्यक्ष शितल पाडवी यांच्यासह पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी,भाजपचे गटनेते अजय परदेशी,शिवसेनेचे गटनेते अनुपकुमार उदासी,नगरसेविका रत्ना चौधरी,जयश्री महाले,अनिता परदेशी,प्रतीक्षा दुबे,प्रतोद शिरीष माळी,हर्षा पाडवी,लक्ष्मी नाईक, गायत्री पिंपरे,मीराबाई कोळी,अरव...