विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन

प्रतिनिधी तळोदा:-- (किरण पाटील)

विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन

 विश्व हिंदू परिषद स्वामी विवेकानंद साप्ताहिक सत्संग मंडळ, तळोदा यांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन व अखंड भारताची शपथ घेण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. कीर्तीकुमार माळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, १९४७ साली भारताचे विभाजन झाले. भारत पुन्हा अखंड व्हावा, यासाठी राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवून प्रत्येक भारतीयाने अखंड भारताचा संकल्प करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेश चौधरी, विश्व हिंदू परिषद विषय संपर्क जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी केले. श्री. डॉ. शांतीलाल पिंपरी, माजी जिल्हा सेवा प्रमुख यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. श्री. संजय चावडा व श्री. अजय माळी यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले.

यावेळी प्रा. राजाराम राणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारी सदस्य, श्री. शिरीष मगरे, साप्ताहिक सत्संग प्रमुख, श्री. मोहन भैय्या रघुवंशी, साप्ताहिक सत्संग सहप्रमुख, श्री. मुकेश जैन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, श्री. नितीन पाटील श्री विजय सोनवणे श्री. सतीश सोलंकी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान घेण्यात आले. तसेच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली.
***************************************              सर्व्यांवर नजर समान 
                तळोदा एक्सप्रेस
                 मुख्य संपादक
                  किरण पाटील 
               मो 9850244331

Comments

Popular posts from this blog

कानुबाई मातेच्या आगमनाने माहेरघरात उत्साह;परिवाराच्या एकत्रीकरणाचा अनोखा सोहळा

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री.बडादादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप