तळोदा येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची २०२६ ची कार्यकारिणी सर्वानुमते निवड
प्रतिनिधी तळोदा:--- (किरण पाटील)
तळोदा येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची २०२६ ची कार्यकारिणी सर्वानुमते निवड
तळोदा तालुक्यातील मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ ची कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
***************************************
सर्व्यांवर नजर समान
तळोदा एक्सप्रेस
मुख्य संपादक
किरण पाटील
Comments
Post a Comment