Posts

Showing posts with the label जि.मा.का

जिल्ह्यात कोरोनाची दस्तक; प्रशासन सज्ज

Image
नंदुरबार शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांनी घाबरू नये, घरातच राहावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.

माजी आमदारांनी स्वतःचे हॉटेल प्रशासन साठी केले खुले

Image
तळोदा:- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील 50 रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील सहमती पत्र जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना दिले.               श्री.चौधरी यांनी  यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भेाजनाची सेवा करण्याचीदेखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धन्यवाद देताना जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त केले. कोविड-19 संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे श्री.चौधरी यांनी यावेळी सांगितले. पीएम केअर निधीला 25 हजार रुपये श्री.गजानन फायबर प्रा.लि. कडून पीएम केअर निधीसाठी 25 हजाराचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिरीष चौधरी, अशोककुमार व...

घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या ’खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना

Image
तळोदा:- लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त कठीण होता. तसा आमचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्हाला थांबविण्यात आल्यानंतर मोठी समस्या समोर आल्यासारखे वाटले, पण इथे घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या आणि माणसांची वागणूक चांगली असल्याने घरापासून असलेला दुरावाही सुसह्य झाला..... ....बंगळूरू येथून राजस्थानकडे निघालेल्या एका कामगाराची ही प्रतिक्रीया राज्य शासन आणि नंदुरबारच्या प्रशासन करीत असलेल्या मदतकार्यातील संवेदनशिलता स्पष्ट करणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या इतरही नागरिकांच्या प्रतिक्रीया अशाच आहेत. परप्रांतातील 116 व्यक्तींची खापर येथील केंद्रात  निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. कोविड 19 च्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जरी जिल्हाबंदी करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांची जिल्ह्यात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्य...

तळोदा बाजार समितीतर्फे ग्राहकांना घरपोच गहू व दादर पुरविण्याची सुविधा..

Image
दि. 16- तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल उत्पादक ते ग्राहक पुरविण्याच्या योजनेअंतर्गत गहू व दादर बाजार भावापेक्षा कमी दराने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक  चाळक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सुरू आहे. बाजार समितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुचनांचे पालन करण्यात येत आहेत. येथे हात धुण्यासाठी साबण व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सामाजिक संस्थांच्या मदतीने भोजन व्यवस्थादेखील करण्यात येत आहे. ग्राहकांना चांगला शेतमाल कमी दरात मिळावा यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी बाजारात गर्दी करू नये यासाठी त्यांना गहू व दादर घरपोच देण्यात येणार आहे. शेतमाल स्वच्छता व प्रतवारीकरण करून प्रत्येकी 25 किलोची बॅग याप्रमाणे देण्यात येईल. सदरचा शेतमाल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दाराशी पोहोच केला जाईल. दादरचा दर 4400 रु व गहूचा दर 2400 रुपये प्रति क्विंटल आहे. इच्छुक ग्राहकांनी  बाजार समिती निरीक्षक संजय कलाल (7066813910/915...