तळोदा बाजार समितीतर्फे ग्राहकांना घरपोच गहू व दादर पुरविण्याची सुविधा..

दि. 16- तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल उत्पादक ते ग्राहक पुरविण्याच्या योजनेअंतर्गत गहू व दादर बाजार भावापेक्षा कमी दराने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक  चाळक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सुरू आहे. बाजार समितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुचनांचे पालन करण्यात येत आहेत. येथे हात धुण्यासाठी साबण व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सामाजिक संस्थांच्या मदतीने भोजन व्यवस्थादेखील करण्यात येत आहे.

ग्राहकांना चांगला शेतमाल कमी दरात मिळावा यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी बाजारात गर्दी करू नये यासाठी त्यांना गहू व दादर घरपोच देण्यात येणार आहे. शेतमाल स्वच्छता व प्रतवारीकरण करून प्रत्येकी 25 किलोची बॅग याप्रमाणे देण्यात येईल. सदरचा शेतमाल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दाराशी पोहोच केला जाईल. दादरचा दर 4400 रु व गहूचा दर 2400 रुपये प्रति क्विंटल आहे.

इच्छुक ग्राहकांनी  बाजार समिती निरीक्षक संजय कलाल (7066813910/9158339910) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
---

सभार 
जि.मा.का

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी