कार्यआरंभ आदेश नसताना काम सुरू चॉकशी ची मागणी
प्रतिनिधी तळोदा
येथील प्रभाग क्रमांक एकमधे लॉकडाऊनच्या काळात सुरु असलेल्या बेकायदेशीर कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्याचे आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगर पालिका हद्दीमधील प्रभाग क्रमांक एक मधिल धानकावाड़ा परिसर व शंकर पार्वतीनगरमधे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊन काळात देखील बेकायदेशीरपणे गटार बांधकाम करने व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे आदि कामे ही कामे सुरु आहेत. नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कार्य आरंभ आदेश न देता सुरु करण्यात आलेली असून नगरपालिकेचे काही पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगमताने सदरील कामे सुरु असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या संदर्भात ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखिल लेखी तक्रार करण्यात आली असून त्याची प्रत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देखिल सादर करण्यात आली होती.मात्र,सत्ताधारी पदाधिकारी यांच्या दबावामुळे त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही असे निवेदनात म्हटले आहे..
Comments
Post a Comment