तळोदा शहरातील 5 हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय पोषण आहार
- Get link
- X
- Other Apps
तळोदा:(सुधाकर मराठे) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ शहरी भागातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषस शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय यांचा समावेश असून तळोदा शहरात जिल्हा परिषद व खाजगी अश्या 14 शाळा असून 5 विद्यार्थी शापोआ वितरीत होणार आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा साथ रोग कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली तरतुदी नुसार सक्षम प्रधिकरण यांच्या मान्यतेने व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात दिनांक ३ मे पर्यन्त संपूर्ण देशात लोकडाउन असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व लहान बालके पोषण आहार पासून वंचित राहत असल्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुमुटो रिट याचिका दाखल झांल्यानंतर त्या दृष्टीने लहान बालके व विद्यार्थी यांना पोषण आहार देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शहरी भागातील शाळा स्तरावर आज अखेर शिल्लक असलेला तांदुळ् विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश शासनाकडून पारित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने याबाबतचे पत्र गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशांव्ये शहरातील 14 शाळाना देण्यात येणार आहे. दरम्यान या आदेशामुळे तळोदा शहरातील 1 ये 8 वीत शिक्षण घेणाऱ्या 5 हजार तीनशे 32 विद्यार्थीना शालेय पोषण आहाराचे वाटप होणार आहे. दरम्यान सदर तांदूळ वाटप करताना हॅट धुण्याची व्यवस्था करून सोशल डिस्टन्स राखणे अनिवार्य केले आहे.
यासोबतच शालेय पोषण आहार घेण्यासाठी व वितरण करणाऱ्या शिक्षक व पालकांनी मास्क वापरावे. १ मिटरचे अंतर ठेवावे. विद्यार्थी किंवा पालक आजारी असल्यास अश्या विद्यार्थ्यांचे तांदुळ घरपोच वाटप करण्याचे नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकट--
केवळ ग्रामीण भागात शालेय पोषण आहार न देता शहरातील विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तळोदा येथील काँग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी, संजय माळी, हितेंद्र क्षत्रिय, सुभाष चौधरी, सतीवान पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने या पत्राचा संदर्भ घेऊन जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कडे शहरातील शाळांना देखील शापोआ मिळावा अशी मागणी करण्यात आली होती.
प्रतिक्रिया***
ग्रामीण भागानंतर आता शहरातील 1 ते 8 वीत शिक्षण घेणाऱ्या 14 शाळेतील 5 हजार विद्यार्थीना शापोआचे वाटप होणार आहे. दरम्यान सदर वाटपा दरम्यान सोशल डिस्टन्स ठेवून, पालकांनी शालेय पोषण आहार घ्यावा, यासोबतच मिळालेल्या सुट्याचा सदपयोग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,
शेखर धनगर
गटशिक्षण अधिकारी
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment