तळोदा पत्ते खेळतांना पोलिसांची धाड

तळोदा प्रतिनिधी
           शहरातील मन स्पोर्ट्स क्लब येथे स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारून पाच लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात महाराष्ट्र जुगार कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यान्वये तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
      यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा रस्त्यावरील एका दुकानात मन स्पोर्ट्स क्लब च्या नावाखाली बावन्न पत्त्यांच्या खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक 4 रोजी सायंकाळी 6.45 वाजता तेथे छापा टाकला असता सहाजण पत्ते खेळताना आढळून आले. 
        त्या सहा जणांसह मन स्पोर्ट्स क्लब च्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले ,पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ ,पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक मनोज नाईक , पोलीस शिपाई विजय देवरे ,राजेंद्र कटके ,सतीश घुले यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान या घटनेची चर्चा तलोद्यात सर्वत्र जोरात सुरू आहे

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी