श्री राम गृप कडून अन्नदान वाटप

 प्रतिनिधी तळोदा
तळोदा शहरात जय श्री राम ग्रुपचा माध्यमातून दरवर्षी राम नवमी ला मोठ्या उत्साहात मिरवणूक निघते  मात्र यंदा कोरोना चा संकट मूळ  शहर व तालुक्यातुन गोळा झालेला निधी  गुजरात राज्यातून येणारे मजूर वर्ग व शहरातल्या गोर गरीब जनतेला अन्न दान करण्याचा संकल्प केला असून  श्री राम शोसल ग्रुप चे स्वयंसेवक दिवसरात्र आमलाड येथील विलगिकरमण कक्ष व ठीक ठिकाणी अन्नदान करत आहेत, कालच १०,००० मास्क व साबण गृपकडून वाटप करण्यात आलेत,

श्री रामपूर्णकृती मूर्ती अखेर रंगवलीच नाही -
तळोदा शहरातील व तालुक्यातील दात्यांनी पुढे येऊन जय श्रीराम गृप च्या माध्यमातून १४ फूट उंच मूर्ती तयार करण्यात येत होती यंदा उत्साहात राम नवमी  निमित्त मिरवणूक निघणार होती मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना आजार च्या  वाढत्या प्रसार मूळ  कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणूक  बंदी असल्याने मूर्ती ला शेवटचा हात न फिरवता व रंग रंगोटी न करता कोरोना च्या कारणाने दररोज हात मजुरी करून पोट भरनाऱ्या लोकांना लॉक डाऊन काळात मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थपक अध्यक्ष अजय परदेशी यांनी तळोदा एक्सप्रेस जवळ बोलतांना सांगितले


 गुजरात राज्यातून पायी व मिळेल त्या वाहने पकडून मजुर मजूर वर्ग अजून ही येतच आहे दरम्यान डोक्यावर तळपत्या सूर्याशी उपाशीच त्यांचा लढा सुरू असून  गुजरात राज्य व महाराष्ट्रातील बसेस पूर्णपणे बंद असून दोघ राज्यांनी अश्या मजूर वर्ग साठी  संयुक्तिक मोहीम राबवली असती (रेस्क्यू अपिरेशन) तर अधिक सोपं झालं असत आज अशीच  धडगावं येथील मजूर वर्ग साधारण ४० लहान मूल वयस्क मानस महिला पायी आल्या होत्या  तसेच बाळापूर जिल्हा अकोला येथील 34 मजूर छोटी पिकअप व्हेन सह जाताना त्यांना अडवून भोजन देन्यात आले सर्वांना आमलड येथील विलगिकण कक्ष येथे वैद्यकीय तपासणी करून  पूढील निर्णय घेण्यात येणार आहे यावेली नेमसुशील शाळा कडून स्कुल बस संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखीया यांनी उपलब्ध करून दिली त्यांना यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या सह विभागातील कर्मचारी उपस्थिती होते,
जय श्री राम गृप कडून जेवण व पाणी देण्यात आले

 
श्री राम सोशल गृप चे सर्व तरुण सदस्य
१४ फूट तयार मूर्ती तयार होऊन फक्ट रंग रंगोटी चे काम बाकी होते मात्र यंदा  कोरोना आजार मूळ मिरवणूक रद्द करून श्री राम जन्म उत्सव निमित्त संकलन केलेला निधीतून  अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आले 

श्रीराम नवमी निमीत्त , जय  मिठाई वाटप-
 श्रीराम सोशल ग्रुप,तळोदा,तर्फे 6000 ,हजार बुंदीचे पाकीट तयार करून त्यांच वाटप करण्यात आले तसेच  यंदा लॉक डाऊन मुळे श्री राम नवमी ची मिरवणूक रद्द झाल्याने हा उपक्रम  राबविण्यात आल्याचे श्री राम ग्रुप कडून सांगण्यात आले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी