भाजी विक्रेत्यांची आरोग्य तपासणी
तळोदा:- तळोदा शहर ‘कोरोना’पासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्याची आरोग्य तपासणी केली जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यापासून भौगोलिकदुरष्ट्या अत्यंत जवळ असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमालगत असलेल्या खेतीया अन सेंधवा या शहरात कोरोनाने दस्तक दिल्यानंतर प्रशासन सक्त झाले असून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्याची जबाबदारी असलेलं भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, दूध विक्रेते अश्या दुकानदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून,कोरोना तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आज तहसिलदार पंकज लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थिती, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशंत पांडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेद्र चव्हाण थर्मल मशीनच्या सहाय्याने तपासणी केली. यावेळी आरोग्य सेवक, जे.आर.जावरे, एम.जी.पिंजारी,आर वी माळकर, आर.के.काळे, आरोग्य सहाय्यक डि.डी गवळी, पी एस चौधरी, शिपाई डि बी बेहरे, बी पी डासनुर, यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment