साहेब तू देव माहू हाय
कालीचरण सुर्यवंशी
सम्पूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे त्यात भारत आणि महाराष्ट्र देखील सुटले नाही आपल्या जिह्यातील कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यात जात असतात ह्या वर्षी देखील कामासाठी गेलेत परंतु कोरोना या महामारीने कामगारावरती महासंकट उभे केले अशात गुजरात राज्याच्या विविध ठिकाना हुन हे मजूर काही किलोमीटर तासनतास पायी चालत महाराष्ट्र सीमे लगत अंबाबारी धारणाजवळ एकत्र आले जवळपास हजार ते बाराशे मजूर अंबाबारी गावाजवळ आले असता स्थानिक लोकांनी त्यांची नास्ता व चहापाण्याची वेवस्था केली.
स्थानिक लोकांनीच शहादा तळोदा चे आमदार राजेश पाडवी यांच्याशी सम्पर्क करून सर्व माहिती दिली. आमदार राजेश पाडवी यांनी सम्पूर्ण माहिती घेऊन मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ढपंर,आयशर,पिकप अश्या गाडीची वेवस्था स्वखर्चाने केली.
पायी चालत आलेल्या मजुरांचे पाय सुजलेले होते तर काहीच्या पायाला फोड आलेले दिसून आले महिलांन सोबत लहान मुलं देखील होते.
आमदार राजेश पाडवी यांनी सर्व माहीती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांना कळवली आमदारांन सोबत डॉक्टरांची टीम देखील अंबाबारी येथे पोहोचली व सर्व मजुरांची तपासणी केली.हे सर्व मजूर तळोदा,शहादा व धडगाव तालुक्यातील होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड प्रांधिकारी अविशांत पांडा अक्कलकुव्वा उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम तहसीलदार कचवे, पोलीस निरीक्षक डांगे,प.स.सदस्य ताराबाई वसावे,राहुल वसावे,नितीन तडवी,हरीश खर्डे, विरसिंग पाडवी,निलेश पाडवी,गोपी पावरा, अरुण बागले,प्रवीण पाडवी,विठ्ठल बागले सोनू पाडवी,संदीप पाडवी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट:वैद्यकीय तपासणी करून झाल्या नंतर ऐका महिलेच्या डोळ्यातुन पाणी आले आणि तिच्या हृदयातुन आर्त हाक आली "साहेब तु देव माहू हाय आम्हा बठाले जीवदान देनो"
मजूर महिला
Comments
Post a Comment