खासदार डॉ हिना गावित यांनी घेतला तळोदा तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा.
तळोदा:- नंदूरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेश राज्यांच्या सीमांना लागून दोन्ही राज्यांच्या लगतच्या शहरात कोरोणाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे कोरणाच्या बाबतीत जिल्हात कोणत्याही प्रकारची रिस्क घेता येणार नाही.प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी अत्यावश्यक आहे अश्या सूचना खासदार हिना गावित यांनी तलोद्यात आयोजित आढावा बैठकीत तालूका प्रशासनाला दिल्या.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समितीच्या सभागृहात खासदार हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष अजय परदेशी,पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, तहसीलदार पंकज लोखंडे,तालूका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे,नगरपालिका मुख्याधिकारी सपना वसावा, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, प.स.आरोग्य अधिकारी सुनील वाघ,कनिष्ठ सहाय्यक युवराज बागुल, गतशिक्षण अधिकारी एस.एम.धनगर तालुका कृषी अधिकारी महाले,भाऊसाहेब पवार, यासह विविध विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली.परराज्यातून आलेले मजूर खेड्यागावात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.त्यांची अंगणवाडी सेविका,तलाठी,ग्रामसेवक, यांच्या मार्फत नोंद करा. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केस निघाले अश्या शहरातून मोठ्या संख्येने नागरीक ग्रामिण भागात दाखल झाले आहेत व होत आहेत.अश्या ठिकाणांहून आलेल्याना सर्वांना गांभीर्याने कॉरन्टाईन करा,अश्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
शेजारच्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने बाहेर गावांहून गावात कोणी येणार नाही.जे आले असतील त्यापैकी कोणाला जर सर्दी,खोकला, श्वास घायाला त्रास होत असेल अश्यांचा आशा वर्कर, परिचारिका,अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्व्हे करा व त्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क न घेता त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवा.पुढच्या आठ दहा दिवस प्रत्येक गावांत दवंडी देऊन लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत प्रशासनाला दिले.
बैठकीत खासदार डॉ हिना गावित यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांच्याकडून तळोदा शहरातील उपाययोजना जाणून घेतल्या.भाजीपाला विक्रेत्यांना अधिकृत पास देणे व प्रत्येक विक्रेत्याला मास्कचा वापर करणे अत्यावश्यक करणे,मास्क नसलेल्या विक्रेत्यांचा विक्री पास रद्द करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी शहरांत चार-पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्था करा,त्याचप्रमाणे जीवनाशयक वस्तूंचा नागरीकांना घरपोच पुरवठा करण्यासाठी स्वयंसेवकांचा मदत घ्या,इत्यादी सूचना देखिल त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या.
पोलिस प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजनाची देखिल त्यांनी माहिती जाणून घेतली.शहरात विनाकारण मोटारसायकलवर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करा,त्यांच्या दंड वाढवा अशी सूचना आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केली.जमा केलेल्या मोटारसायकली पाच दिवसानंतर,शक्य असेल तर देऊच नका,असे खासदार डॉ गावित यांनी पोलिस प्रशासनाला सूचित केले.गटविकास अधिकाऱ्याकडून त्यांनी गावांत करण्यात येणाऱ्या निर्जंतुकिकरणाची माहिती जाणून घेतली.कृषी अधिकारी यांनी शेतीविषयक बाबींची माहिती सांगितली. शेतमाल घेण्यासाठी येणारे परराज्यातील गाडीवरील ड्रायव्हर व लोक यांची नोंदी ठेवा,ते बाहेर फिरणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ गावित यांनी बैठकीत केंद्र शासनाकडून लॉकडाऊनच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य वितरीण व्यवस्थेअंतर्गत विशेष योजनांना आढावा देखिल घेतला.अन्नधान्यावाचून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांना देखिल धान्य उपलब्ध करून देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी,असे त्यांनी बैठकीत सांगितले.
गावात बँकेच्या सुविधा पोहचवा :-
बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात गर्दी करतांना दिसून येत आहेत.त्यामुळे सोशल डिस्टनसिंगला हरताळ फारसला जात आहे शिवाय बँकेच्या कर्मचाऱ्यांवर देखील ताण वाढत आहे. त्यामुळे बँक मित्र,ग्रामिण पोस्टल बँक,सिएमपी केंद्र चालक यांना तालुक्यातील गावे वाटून त्याना गावांगावात पाठवून नागरिकांना बँकेच्या सोयी उपलब्ध करून द्या,असे आदेश बैठकीत खासदार डॉ हिना गावित यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Comments
Post a Comment