तळोदा प्रशासन प्रतिबंधकात्मक क्षेत्र साठी सज्ज
तळोदा:- राज्यशासनाने जारी केलेल्या आदी सुचने नुसार तळोदा येथे शिथिलता देण्याबाबत व
कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत उपविभागीय कार्यालय येथे खातेप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. पूर्व उपाययोजना म्हणून वार्ड निहाय प्रतिबंधात्मक क्षेत्र विभाजून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनसाठी राज्यात जारी केलेला नवीन अधिसूचने नुसार शहर शिथिल करण्याबाबत व भविष्याच्या उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून, खातेप्रमुखांची आढावा बैठक प्रांताधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात पार पडली. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहाय्यक गटविकास अधिकारी, आर.बी.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर,
पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी आदी उपस्थित होते.
दरम्यान अविशांत पंडा यांनी सांगितले की, आजपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता मात्र नंदुरबार येथे कोरोनाने दस्तक दिलेली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 19 जनांचे अहवाल अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसून खबरदारी घेण्याची व सतर्क राहणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याबैठकीत शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र, फरसाण दुकाने,
आदींना सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यात ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत. मनरेगाचे कामासोबतच इतर बांधकामे सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याकरिता मजूर स्थानिक असावेत, ठेकेदाराने लागणाऱ्या त्यांच्या अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात यासोबतच व मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदी बाबी अत्यावश्यक केले आहे.
यासोबतच तालुक्यातील साखर कारखाने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला, कारखान्यांच्या परिसरात कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी कर्मचारी येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी. त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळावे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणतीही व्यक्ती अशा ठिकाणी कामावर येऊ शकणार नाही. यासोबतच अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषी विषयक सर्व बाबीना मान्यता देण्यात आहे आहे. त्यात बालके स्तनदा माता यांना पोषण आहाराचा घरपोहच पुरवठा केला जाईल, यासोबतच मीठाईचे दुकाने, पोल्ट्री फॉर्म, सिंचन अन जलसंधारनाच्या कामांना मनरेगा मधून मान्यता प्राधान्य देण्यात आले,
सहकारी पतसंस्था सुरू राहतील,
यासोबतच अत्यावश्य सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबी सुरू राहणार आहेत.
तळोदा शहरात भविष्यात एखादा रुग्ण आढळल्यास पूर्व उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करण्यात आले त्यात 9 विभागात शहराचे विभाजन करून प्रतिबंधात्मक क्षेत्र अधिकारी नेमण्यात आले. त्यासोबत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, 2 आशा कर्मचारी, 1 अंगणवाडी सेवीका व पोलीस कर्मचाऱ्यांची समिती तयार करण्यात आली. सदर समिती ही नेमून दिलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रावर नियंत्रण ठेवणार आहे. पालिकेकडून प्रत्येक क्षेत्रात आवश्यक साहित्य पूरवठा करणाऱ्या व्यावसायिकांची विगतवारी करून विभाजन करण्यात आले असून पालिका प्रशासन उपाययोजनेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी मुख्यधिकारी सपना वसावा यांनी सांगितले.
पालघर येथे घडलेल्या अमानुष घटनेबाबत चर्चा करण्यात आली. खबरदारी म्हणून ग्रामदक्षता समितीना याबाबत सूचना करण्याचे आदेश दिले.
Positive.. News...👍
ReplyDelete