भाजी बाजाराची खासदार डॉ हिना गावीत व आमदार डॉ विजय कुमार गावीत यांच्या कडून पाहणी
सुनील सूर्यवंशी
तळोदा प्रतिनिधी
झापी , सिंदि दिगर, तोरणमाळ, या दुर्गम भागातील गाव पाडे हे मध्यप्रदेश चा जवळ येत असल्याने त्यांना गावातील सीमा सील करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत ,असे खासदार डॉ हिना गावीत यांनी बोलतांना तळोदा एक्सप्रेस शी सांगितले
काल संध्याकाळी धडगाव भागातील आढावा घेऊन त्या तळोदा मार्गे नंदुरबार जात असताना बस स्थानकावर भाजी बाजारात डॉ विजयकुमार गावित यांनी फेर फटका मारून पाहणी केली नुकतेच तलोद्यात आढावा बेठकीत खासदार डॉ हिना गावीत व आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी आवश्यक त्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या होत्या,
त्यात भाजी बाजारात सुरक्षित अंतर ठेवणे तसेच प्रत्येक भाजी विक्रते ने मास्क लावण्या बाबत पालिका मुख्यधिकारी सपना वसावा यांना सूचना दिल्या होत्या , मात्र काही भाजी विक्रेते मास्क न लावता भाजीपाला विकत असल्याचे डॉ विजय कुमार गावीत यांचा लक्षात आल्याने नगराध्यक्ष अजय परदेशी यांना या बाबत पालिका मुख्यधिकारी यांना सूचना देण्याचे आदेश द्या अश्या सूचना दिल्यात,
जिल्हाभरात एकंदरीत परिस्थिती पाणी व आढावा बैठक खासदार डॉक्टर हिना गावित व नंदुरबार चे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित येत असून त्याच्यात भाग म्हणून आज सायंकाळी येथील भाजीबाजारात गावरान भाजी घेण्यासाठी दस्तुरखुद्द डॉक्टर विजयकुमार गावित त्यांनी भाजीबाजारात हजेरी लावली,
गुंदडी चा मोहोर
Comments
Post a Comment