रमजान ची नमाज घरातच अदा करा,,,, निसार दादा मक्राणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमझान ची नमाज घरातच अदा करा -निसार मक्राणी (प्रगतशील शेतकरी)


 प्रतिनिधी तळोदा

 :-प्रत्येक मुस्लिम बांधवांनी  रमजान  महिन्यात मशिदीमध्ये न जाता घरातच सामाजिक अंतर ठेवून नियमित नमाज अदा करावी सोबतच शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने कोरोणाचा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील रहावे . असे आवाहन प्रतापपूर येथील प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्राणी यांनी केले आहे.
  सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून  मुस्लिम समाजातील लोकांकडून रोजा ठेवला जात आहे.रोजा सोडण्यापूर्वी मशिदीत जाऊन सामुदायिक नमाज अदा करणे हे प्रथम कर्तव्य मानले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सध्याच्या काळात मशिदीत जाऊन नमाज अदा करता येऊ शकत नाही.म्हणून प्रत्यकाने आपापल्या घरीच  नमाज अदा करावी असे आवाहन तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथिल शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी निसार मक्राणी यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे.  आधीच्या काळी देखिल मस्जिद नव्हत्या , मंदिर नव्हते पण त्याकाळी देखील रोजा ठेवला जात असे व्रत केले जात असे.म्हणून सच्च्या अंतकरणापासून आपण घरात राहूनच नमाज अदा केली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारी ने कशाप्रकारे संपूर्ण जग हादरले आहे हे आपण टीव्हीवर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत.  हे पाहून डोळ्यात अश्रू येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी देशात लॉकडाउन चा  निर्णय घेतल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेने फार कमी आहे. यासाठी भारतवासी यांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुस्लिम बांधवांनी कोरोना या संसर्गजन्य आजाराला गांभीर्याने घेऊन, आपली लहान बालके  कुठे जात आहेत?याकडे ही लक्ष दिले पाहिजे. रमजानच्या महिन्यात इफ्तार च्या निमित्ताने एका ताटात जेवण करण्याची प्रथा आहे. मात्र सध्यस्थीतीत असे जेवण करणे हे योग्य ठरणार नाही. शासनाने सोशल डिस्टिंक्शन सांगितले आहे, ते पाळले गेले पाहिजे. लॉक डाउन काय आहे? मास्क लावणे का गरजेचे आहे? कोरोनाच्या बचावासाठी घरात राहणे का बंधनकारक आहे? या साऱ्या गोष्टींचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा.आपण सर्व एकत्रितरित्या येऊन कोरोनाविरुद्ध लढलो तर लवकरच कोरोनाला हरवू शकतो,यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील मक्राणी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी