आमलाड शिवारात बिबट ची दहशत
प्रतिनिधी तळोदा - नगरसेवक गौरव वाणी यांच्या आमलाड येथील शेत शिवारात रात्रींच्या सुमाराला बिबट्याने त्यांचा पाळीव कुत्र्याचा फडश्या पडल्याची घटना घडली. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे...
आमलाड शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्रलाल वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला व त्यास बहुरुपाकडे जबड्यात ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Comments
Post a Comment