रोजगार हमीची अपूर्ण कामे पुर्ण करण्यात नंदुरबार राज्यात प्रथम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2019-20 या वर्षात जिल्ह्याने 25 हजार 172 कामे अपूर्ण कामे पुर्ण केली असून अपूर्ण कामे पुर्ण करण्यात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी या कामगिरीबद्दल जिल्ह्यातील विविध यंत्रणा आणि जिल्हा परीषद व ग्रामपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात 2018-19 मध्ये 24.80 लक्ष मनुष्यदिवस साध्य करण्यात आली होती, तर यावर्षी 25.32 लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये 40 टक्के महिलांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात निवडणुका आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या तुलनेत 0.52 लक्ष मनुष्य दिवसाची वाढ झालेली आहे.
तसेच 2018-19 मध्ये 78 हजार 937 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला होता. यावर्षी त्यातदेखील वाढ झाली असून 88 हजार 95 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थात गतवर्षीपेक्षा 9 हजार 158 अधिक कुटुंबांना या येाजनेचा लाभ मिळाला आहे. गतवर्षीच्या 61.45 कोटीच्या तुलनेत यावर्षी 68.31 कोटी रुपये खर्च झाला आहे. 6.86 कोटींची अधिकची कामे या वर्षात करण्यात आली.
यावर्षी 33 हजार 60 कामे प्रगतीपथावर असून 2020-21 या वर्षासाठी 30.14 लक्ष मनुष्यदिवसाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. योजनेअंतर्गत केंद्र शासनाने 1 एप्रिल 2020 पासून मजुरांना द्यावयाच्या अकुशल मजुरीचा दर महाराष्ट्रासाठी 238 रुपये प्रतिदिन इतका निश्चित केला आहे.
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर कामाची मागणी अधिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात 31 हजार 789 कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. मजुरांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी व ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. मजुरांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
साभार जी,मा, का, नंदुरबार
Comments
Post a Comment