प्रशासन प्रयत्नशील मात्र नागरिक उदासीन
प्रतिनिधी तळोदा
कोरोना या संसर्गजन्य विषाणू वर अद्याप औषध तयार झालेले नसून या रोगांची लागण दिवसेंदिवस वाढतच आहे यावर सद्या तरी सोशल डिस्टनसिंग हाच उपाय असून सर्वत्र विविध माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवा अश्या स्वरूपांचे संदेश देऊन देखील तलोद्यात ठीक ठिकाणी त्यांचं उलघंण होताना दिसत आहे,
कोरोना रोगांवर अजून औषध तयार करण्यात आलेले नसून जगभरात या महामारीने थैमान घातले असून लाखोंचे जीव गमवावा लागला आहे कोविड 19 हा संसर्गजन्य विषाणू अजून पसरतच आहे. त्यांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन व्यक्ती मध्ये अंतर ठेवा असे विविध माध्यमातून संदेश देऊन देखील तळोदा शहरात विविध बॅंक, भाजी बाजार, याठिकाणी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टसिंग न पाळता सूचना देवून व उभे राहण्यासाठी चौकटी आखून देखील लोकं रेटून गर्दी करत गोळका केलेला दिसून येत आहे,
प्रशासन प्रयत्नशील मात्र नागरिक उदासीन -
शहरात पोलीस प्रशासन, आरोग्य , महसूल, यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती साठी रिक्षा फिरवुन संदेश दिला जात आहे. मात्र तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत, वास्तविक सर्व किराणा दुकान, मेडिकल, भाजी बाजार, विविध बॅंका या ठिकाणी चुन्याने सुरक्षित अंतरावर उभे राहण्यासाठी चौकट आखल्या आहेत मात्र या आजारचे कोणतेही गांभीर्य लोकांना दिसून येत नाही कारण की सोशल डिस्टन्स हा स्वयंमशिस्त म्हणून अपेक्षित असून लोक जोवर ती घालून घेत नाही तोवर आदेश काढून उपयोग नाही मर्यादित मनुष्यबळ व त्याचा कित्येक पट लोकसंख्या असणाऱ्या देशात तर ते अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसुन येत नाही ही दुर्देवाची बाब आहे.
Comments
Post a Comment