आदिवासी मजूरांना आदिवासी महामंडळाकडील धान्य वितरण होणार
आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले निर्देश

प्रतिनिधी तळोदा
-  लॉकडाऊनच्या परिस्थितीत बेरोजगार झाल्याने राज्यातून किंवा परराज्यातून स्थलांतरित झालेल्या  आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडे खरेदी केलेले धान्य खुल्या बाजारात न विकता आदिवासी मजुरांना वाटप करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आदिवासी विकास महामंडळाने धान, वरई , तूर,खुरसणी इत्यादी अन्नपदार्थांची  सुमारे तीस हजार क्विंटलची खरेदी एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत केली आहे.  ॲड.पाडवी यांच्या निर्देशानुसार व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला शनिवारी मंत्र्यांनी मान्यता दिली व याबाबतचे आदेश आज महामंडळाला शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.

सदर आदेशानुसार महामंडळाकडील धानाची भरडाई करून पॅकिंग केल्यानंतर त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागात असलेल्या आदिवासी मजुरांना या धान्याचे वाटप करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्याच्या मागणीनुसार धान्य देण्यात येणार आहे. महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
  साभार -जी,मा, का, नंदुरबार
 
----

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी