Posts

Showing posts with the label समस्या

तळोदा पोलिस प्रशासनाने चोरीचा तपास गतिमान करण्यासोबतच राजकिय दबावाला बळी न पडण्याची गरज

Image
कालीचरण सूर्यवंशी        तळोदा शहरात दिवसा ढवळ्या एक शिक्षकाचा घरी घरफोडी झाल्याने शहरातील नवीन  वसाहती मध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलिसांचं भयच आता चोरांना राहिले नाही की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे.       तळोदा शहरात नवीन वसाहत परिसरात दरवर्षी घरफोडी होत असते त्या चोरीचा तपासात किती गुन्हाच छडा लागतो किती मुद्देमाल सापडतो हा निश्चितच शोधाचा विषय आहे.        तळोदा  तालुका पोलिस स्टेशन मध्ये खूप दिवसांनी पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक लाभला असून त्यांचे स्वागत जरी दिवसा ढवळ्या  झालेल्या धाडसी चोरीने आज्ञात  चोरट्यांनी केले असले तरी  पहिल्याच दिवशी रुजू झाल्या नंतर मुख्य रस्त्यावरील दुचाकी वर कार्यवाही करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला . तसेच शाळा महविद्यालयात  भेटी देवून समस्या जाऊन घेत थेट संपर्क व थेट कार्यवाही होवु शकते याचा नमुना दाखवला असला तरी नुसते आरंभ म्हणून कार्यवाही नको तर त्यात सात्यत असल्याशिवाय शिस्त लागणार नाही . राजकीय दबावाला झुगारून शहरात कडक शिस्त लावावी - तळोदा शहरात कायदा काही ठर...

व्यापाऱ्यांकडून लूट; प्रशासन तक्रारीच्या प्रतीक्षेत

तळोदा:-(सुधाकर मराठे) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून शहरात वाढीव दराने विक्री सुरू आहे.  पुरवठा विभाग सांभाळणारे याकडे कानाडोळा करत असून अजून तक्रार येण्याची वाट पाहत आहेत. तक्रार आली की आम्ही कारवाई करणार असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ग्राहकांना पक्के बिल मिळत नसल्याने तक्रार करणे अवघड होतं आहे. परिणामी शहरात ग्राहकांची लूट सुरू असून अद्याप एकाही रीतसर तक्रार दाखल नसल्याने व्यापाऱ्यांवर वचक नसल्याचे चित्र आहे.                    लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांना आता व्यापाऱ्यांनीही लुबाडण्यास सुरुवात केली आहे. मालाचा पुरवठाच झालेला नाही,  शिल्लक काही नाही, आम्ही माल कसे आणतो आम्हालाच माहीत, वरूनच महाग येतोय, असे विविध कारणे दुकानदार सांगत आहेत. त्या मालाची चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. खाद्यतेल, धान्य, कडधान्य साखर यांच्या दरामध्ये ही लक्षणीय वाढ दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत खाद्यतेल एका डब्याच्या मागे जवळपास दीडशे ते अडीचशे रुपये एवढ्याने महागलेले आहे. तीच परिस्थिती इतर साहित्य...