विलगीकरण कक्षातील स्थलांतरित मजुरांच्या अस्थिर आयुष्याला समुपदेशनाचा आधार
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम तळोदा :(सुधाकर मराठे) कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्याबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत समुपदेशन सेवा पुरवण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातच अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी तळोदा प्रकल्पाच्या माध्यमातून निवास केंद्राची सोय करण्यात आली आहे. कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ४ स्थलांतरित मजुरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या या स्थलांतरित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या उत्तम मानसिक आरोग्याची खबरदारी घेण्यात येत आहे. या चार मजुरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असताना त्यांच्याशी प्रकल्प अधिकार्यांनी संवाद साधला. दिवसाची मजुरी नाही, घरी परत जाता येत नाही, कुटुंबाशी संवाद होत नाही, अशा परिस्थितीत विलगीकरण कक्षात ठेवल्यावर या मजुरांना ...