अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी तळोदा:- (किरण पाटील) अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर उत्साह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबार व जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. शामकांत पाथवड यांच्या हस्ते करण्यात आले. ईद निमित्ताने प्राण्याची कुर्बाणी देण्याच्या रूढी टाळून त्या ऐवजी स्वतःचे रक्ताचे दान करून सामाजिक संदेश देत देण्यासाठी अनिसकडून दरवर्षी हा सामाजिक उपक्रम जातो.या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी २७ मे ते २ जून या कालावधीत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे बकरी ईद निमित्ताने “रक्तदान सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्त संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. धार्मिक सण अधिक समाजाभिमुख व मानवतावादी पद्धतीने साजरे व्हावेत, या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येन...