बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हातोडा रस्त्याला नामकरणाची मागणी
प्रतिनिधी तळोदा:--
(किरण पाटील)
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हातोडा रस्त्याला नामकरणाची मागणी
तळोदा : १७ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून तळोदा शहरातील हातोडा रस्त्याला ‘स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोदा शहराच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, तळोदा नगर परिषद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हातोडा रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment