आई याहा मोगी फ्रेंड्स ग्रुपतर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

प्रतिनिधी तळोदा:---
(किरण पाटील)

आई याहा मोगी फ्रेंड्स ग्रुपतर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

तळोदा : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तळोद्यात विविध क्षेत्रांत सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी डॉक्टर, सर्पमित्र, आरोग्यदूत, रुग्णवाहिका चालक, पत्रकार आदींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजहित, आरोग्यसेवा, पर्यावरण रक्षण आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती लाभली.

        तळोद्यातील बिरसा मुंडा चौकात हा कार्यक्रम पार पडला.. सर्वप्रथम बिरसा मुंडा यांचा पुतळ्याचे पूजन करण्यात आले. आकर्षण रोषणाईने पुतळ्याची सजावट करण्यात आली होती. समाजहित, पर्यावरण रक्षण आणि मानवतेच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये डॉक्टर, सर्पमित्र, आरोग्यदूत, रुग्णवाहिका चालक, पत्रकार आदींचा समावेश होता. समाजासाठी पडद्यामागे राहून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

    कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, पोलीस अधीक्षक, अश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी लागिमा तिवारी, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, आमदार राजेश पाडवी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, समिधा नटावदकर, कैलास चौधरी,  यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी आई याहा मोगी फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष प्रेम पाडवी विनोद माळी अक्षय  धानका अनिल पाडवी चेतन शर्मा सुनिल धानका मयूर पाडवी नामदेव पाडवी अर्जुन पाडवी दीपक पाडवी निलेश पाडवी राज पाडवी वसंत पावरा अनिल पवार दिनेश पावरा तुषार पाडवी कृष्णा धानका विशाल धानका विष्णू धानका दिवाना धानका विनेश पाडवी अक्षय पाडवी 
विनय धानका जॉन्सन नाईक ओमनात धानका राहुल टवाळे वैभव मगरे चिनू माळी प्रतिक मगरे राजू पावरा रवि पावरा
यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

कानुबाई मातेच्या आगमनाने माहेरघरात उत्साह;परिवाराच्या एकत्रीकरणाचा अनोखा सोहळा

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री.बडादादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप