कोठार आश्रमशाळेत बिरसा मुंडा यांना अभिवादन
प्रतिनिधी तळोदा:---
(किरण पाटील)
कोठार आश्रमशाळेत बिरसा मुंडा यांना अभिवादन
तळोदा : तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोतीलाल पाडवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ दिलीप पाडवी, हरीश पाडवी,दिलीप वसावे,राजू पाडवी, मुख्याध्यापक जयवंत मराठे निंबा रावळे,योगेश चव्हाण, पन्नालाल पावरा,मांगीलाल भदाणे,निता गुरव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जयवंत मराठे यांनी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत भूमिका मांडली. अध्यक्ष मनोगतामध्ये सरपंच मोतीलाल पाडवी यांनी सांगितले की बिरसा मुंडा हे संपूर्ण भारत देशातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन आज आदिवासी बांधव विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे सांगितले.यावेळी ग्रामस्थांना विविध आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी ब्रह्मराज नाईक,मनोज चिंचोले, महेश वायकर, किर्तीकुमार वाणी, योगेश भारती सागर सोजळ दिग्विजय राजपूत आदिसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले.
Comments
Post a Comment