स्वातंत्र दिनी ध्वजारोहण नवीन इमारतीच्या आवारात; नगराध्यक्ष अजय परदेशी

तळोदा : नगर पालिकेची वादग्रस्त, रद्द झालेली सर्व साधारण सभा आज सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली असून कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सभा पार पडली असून जिल्हातील व्हिडीओ कॉन्फरन्स वर सभा घेण्याचा पालिकेतील सभा बाबत हा पहिला प्रयोग ठरला आहे. कनेक्टिव्हिटीची समस्या व ऑनलाइन सभेचा पूर्वानुभव नसल्याने सभा केवळ 45 मिनिटात उरकण्यात आली.. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महा- नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती यांच्या सर्व बैठका व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या सभेत बायो डीझल गॅस व खान्देशी गल्लीत समोरील मुतारी हे विषय स्थगित ठेवण्यात आले आहेत, तर एक बियर बारचा ठराव मंजूर करत सर्व विषयांवर चर्चा होऊन 54 विषय पैकी 52 विषय मंजूर करण्यात आले. सुरुवातीला 1 ते 5 व...