मोफत धान्य वाटपाचे श्रेय लाटू नये; आमदार राजेश पाडवी

तळोदा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च पासून संपूर्ण भारत देश लोकडाऊन केला आहे या अनुषंगाने देशातील गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र शासनाने एप्रिल ते जून तीन महिन्या करिता ५ किलो तांदूळ प्रति व्यक्ती धान्य वितरणास सुरुवात केली आहे माहे एप्रिल महिन्याचे विनामूल्य तांदूळ वाटप अंतोदय व प्राधान्य कुटुंबास धान्य वाटप सुरू केले आहे बऱ्याच खेडे गावात काही स्थानिक पुढारी ग्रामस्थांची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा प्रयन्त करीत आहे ही योजना केंद शासनाची असून कोणत्याही स्थानिक राजकारणाचा भुलथापांना बडी पडू नये असे एका निवेदनाद्वारे शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी जनतेला सूचित केले आहे. सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यात आपण सर्व्यांनी सोशलडीस्टन योग्य ते पालन करून मास्क चा वापर करून केंद्र व राज्य शासनाचा दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ दिला नाही. आपणास या परिपत्रकाद्वारे विनंती करण्यात येते की अशीच दक्षता घेऊन पंतप्रधान नरेंद मोदी तसेच मुख्यमंत्री ...