सातबारा उतारा शिवाय शेतकरी पीक कर्जापासून वंचित
जवळपास महिनाभरापासून सेतू केंद्रावरील सात-बारा लिंक काम करत नसल्याने शेतकर्यांना पीक कर्जासाठी लागणारा अत्यावश्यक सातबारा मिळविण्यास अडचण येत आहे , तसेच लॉक डाऊन मुळे तलाठी कडूनही सातबारा मिळविणे कठीण झाले आहे, या सर्व कारणांनी शेतकरी चांगलाच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता बँकांकडून पिक कर्ज मिळवायचे कसे? या चिंतेने शेतकरी राजाला ग्रासले आहे नियमित कर्ज परतफेड केल्यानंतर नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी बँकांमध्ये नवीन अद्यावत सातबारा उतारा व इतर कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु जवळपास महिनाभरापासून लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच सेतू केंद्रांवरील सातबारा लिंक काम करत नसल्याने सातबारा उतारे निघत नाहीत. त्याचप्रमाणे लॉकडाउन मुळे तलाठी देखील आपल्या सजेवर उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गाला सातबारा उतारा साठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्वांमुळे शेतकरी वर्ग चांगलेच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता पिक कर्ज मिळवायचे कसे या विचाराने चिंतातुर झालेला आहे. ...