तळोदा:- (सुधाकर मराठे) तालुक्यातील कोरोना आजार मूळ लॉक डाऊन पूर्वी ११००-१२५० असणाऱ्या केळी चा भाव ३०० च्या भावाने आडमुठे धोरण ठेवून मागितली जात आहे त्यामुळं मोठा आर्थिक फटका तळोदा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी ना बसत आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका शेतमालाला बसत आहे. बाजारपेठा बंद, दळणवळणाची असुविधा, व्यापाऱ्यांचा नकार यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग निघण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात शहादा, तळोदा अक्कलकुवा तालुक्यासह इतर भागात केळीचे उत्पादन घेतले जाते. हा माल बहुतांश स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री होतो. यंदा हंगामाच्या तोंडावर कोरोनाचे संकट उभे ठाकले. सध्याच्या परिस्थितीत तोडगा काढणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे केळी विक्रीही बाजारपेठांमध्ये ठप्प झालेली आहे. व्यापाऱ्यांकडून जोपर्यंत मागणी येत नाही तोवर केळी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होणे शक्य नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत केळी विक्रीसाठी सुविधा देतानाच दळण वळणातही अडचण येणार नाही, असे धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याची मागणी केळी उत्पादक करीत आहेत. सध्या या भागातील केळी उत्पादकांकडे शेतात माल तयार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे बारा टन च्या वर माल आहे. अशा परिस्थितीत केळीची बाजारपेठे खुली न झाल्यास या भागातील शेकडो टन केळी कशी व कुठे विकायची हा पेच तयार होऊन शेतकऱ्यांसमोरील अडचण आणखीच वाढण्याची चिन्हे आहे. दरम्यान या बाबतीत तालुक्यातील शेतकरी दररोज प्रशासन कडे पाठपुरावा करत यातून मार्ग काढण्यासाठी विचारणा होत आहे,पंपई व टरबूजची अवस्था तशीच असून फळ शेताताच पिकत असून लवकर मार्ग न निघाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
वाहतूक अडचण -
दरम्यान तोडणारे मजूर मिळत आहेत तर इथून बाहेर जाणारा माल घेऊन जाण्यासाठी आवश्यक पास कश्या मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे, व्यापारी भाव कमी देण्यासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, या भागात माल घेऊन जाण्यासाठी पास चा हट्ट धरत आहे त्यामुळे परिस्थितीत अधिकच बिकट झाली आहे. तळोदा तालुक्यात ३०० हेक्टर क्षेत्रात केळी लागवड दरवर्षी होते, त्याच सोबत जिल्ह्यात ऊस नंतर सर्वधिक पीक केळी च घेतलं जातं तालुक्यातुन करोडो रुपये उलाढाल करणारा केळी उद्योग ठप्प झाला आहे
Comments
Post a Comment