कोरोनामुळे केळीचे भाव वधारले

 तळोदा:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही कमी होत नसल्याने वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळी डोळ्यांदेखत फेकून देण्याच्या स्थितीत आल्याने केळी उत्पादकही अक्षरशः हतबल झाले आहेत. सध्या बाजारात मागणीच नसल्याने कोरोना आजार मुळे व व्यापारी कमी भाव मागत होते आता तर येतच नसल्याने झाडे वजनाने गळून पडत आहेत अनेकांनी केळी उखडून फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे
  काळजावर दगड ठेवून शेतकरी कवडीमोल भावात केळी विकण्यासाठी धडपड करीत आहेत. आतापर्यंत झालेला लाखो रूपयांचा खर्चही निघणे सोडा ते काढण्यासाठी मजुरी देखील परवडणार नाही अशी स्थिती आहे.
गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यंदा पाण्याच्या मुबलकतेमुळे तालुक्यात हजारो  हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीसह आलेल्या विविध संकटांवर मात करून तळोदा तालुक्यातील 
 करण्यासाठी हजारो रुपये वर्षभरात रासायनिक खतांचे तीन डोस दिले. याशिवाय निंदणी, वखरणी असा एकूण चार ते पाच लाखांपर्यंत खर्च आला. आता हिच केळी कापणीला आली असून केळीला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कोरोनाच्या रूपाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. सुरु असलेले लॉकडाऊन आणखीन वाढवण्यात आल्याने त्याचा फटका शेतीमालाला बसला आहे. 
शेतात होणार मातीमोल 
‘लॉकडाऊन’मुळे केळीचा गोडवाच गायब झाला आहे. लॉकडाऊन असल्याने कोणताच केळी व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नाही. 
  केळी पीक अधिक काळ टिकणारे नाही. त्यामुळे बदलत्या हवामानाचा केळीला कसा फटका बसेल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत मेहनत घेऊन जतन केलेल्या केळीला अत्यंत कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून केळी जगवली. पण आता बाजारात भावच नसल्याने आणि खरेदीसाठी कोणी पुढे येत नसल्याने परिपक्व झालेली केळी शेतातच मातीमोल होते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी