कोरोनामुळे बैल बाजार बंद, कोट्यावधीचे व्यवहार ठप्प
प्रतिनिधी तळोदा
- तळोदा येथे अक्षय तृतीया निमित्त कालिकामाता यात्रोत्सव सोबत बैल बाजारासाठी प्रसिद्ध मानली जाते. मात्र मागील वर्षी कोट्यवधी ची उलाढाल होणाऱ्या हा बाजार यंदा भरणार नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ला मोठा आर्थिक फटक बसणार आहेत,
तलोद्यात बैल बाजाराचे कोट्यवधींची उलाढाल होत असते. मागील वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने गुरांना पिण्याचा पाण्याची व चाऱ्याची समस्यां उदभवत असल्याने अनेकांनी आपले सर्जे राजे विक्रीस आणले होते मागील वर्षाप्रमाणे यंदा या बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली असती असे अंदाज होते मात्र कोरोना आजार मूळ यंदा हा व्यवहार ठप्प होणार झाला आहे
. तळोदा बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्डात दरवर्षी यात्रा भरवण्यात येते
या बाजारात गुजरात, महाराष्ट्र्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, सोबतच सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील बैलांसह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावठी व ठेलारी प्रजातीच्या बैल याठिकाणी विक्रीस मोठी मागणी असते,
बैलबाजारानिमित्त इतर पूरक व्यावसायिकांनीही याठिकाणी हजेरी लावतात,
. तर याठिकाणी दाखल झालेल्या बैलासाठी ग्रामीण भागातील खेड्या पाड्यावरून मजुरांनी चारा विक्रीस आणला जातो दरम्यान या चारा विक्रीतून चांगलाच रोजगार त्यांना उपलब्ध होतो, त्यांना देखील यंदा फटका बसला आहे,
Comments
Post a Comment