नगराध्यक्ष कडून १०,००० मास्क वाटप
तळोदा:- नगराध्यक्ष परदेशी याच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ शहरात 10 हजार मास्क व हात धुण्याचे साबणाचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्ष अजय परदेशी यांचे वडील कै. छबुलाल परदेशी यांच्या द्वितीय स्मृतिप्रित्यर्थ वैश्विक महामारी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळोदा शहरात 10 हजार मास्क व हात धुण्यासाठी साबनाचे वाटप करण्यात आले. दरम्यान सदर मास्क व साबण हे त्या त्या प्रभागातील नगरसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले. त्या नुसार प्रत्येक वार्डनिहाय नागरिकांपावेतो मास्क व हात धुण्याचे साबन पोहचविण्याचे कार्य दिवसभर सुरू होते. याबाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी स्वच्छता राखण्याचे व शासनाच्या सूचना पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष परदेशी व सर्वच नगरसेवकांनी केले आहे....
Comments
Post a Comment