लोकडाऊनच्या काळात शेतशिवारातील भारनियमन रद्द करा:- आमदार राजेश पाडवी

 तळोदा - कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. परिणामी सर्वच उद्योग व्यवसाय बंद असताना अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकरी शेतात राबून आपले पिके वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. उद्योगधंदे कारखाने बंद असल्यांने विजेचा खप कमी आहे, त्या अनुषंगाने दिवसा विद्युत पुरवठा खंडीत करू नये अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

         वैश्विक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे, परिणामी जीवनावश्यक दुकाने वगळता, सर्वच उद्योग धंदे, कारखाने बंद आहेत. अश्या प्रतिकूल परिस्थितीत ही बळीराजा शेतात राबून पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे.
       मात्र महावितरणाकडून भारनियमनाचे कारणे पुढे करून दिवसाच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे.  बऱ्याचवेळा दिवसा व रात्री असा खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे कोरोना हे मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकरी या चिंतेत असताना विजेअभावी पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. पिकलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे, असे असताना विजेअभावी उन्हाळी पिके धोक्‍यात आली आहेत. दिवसाचा सुमारास भारनियमन होत असल्याने व या व्यतिरिक्त ही सतत खंडित होणारा वीज पुरवठामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उद्योग व्यवसाय कारखाने आदी बंद असल्याने वीजेचा खप कमी आहे. त्यामुळे दिवसा होणारे भारनियमन रद्द करून विद्यूत पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
   

प्रतिक्रिया***
             शेतात पाणी भरण्यासाठी अनेक शेतकरी विजेकडे डोळे लावून बसलेले दिसतात. पाणी असूनदेखील डोळ्यासमोर पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. पाणी आहे तर वीज नाही अन्‌ वीज आहे तर पाणी नाही, अशी परिस्थिती तालुक्‍यात पहायला मिळत आहे.  रात्रीचे भारनियमन कमी करून विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

*राजेश पाडवी*
आमदार
शहादा तळोदा मतदार संघ

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी