तळोदा डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त घरपोच अन्नदान
सुनील सुर्यवंशी
आंबेडकर जयंतीच्या खर्चातून गरजू कुटूंबांना जीवनाशयक वस्तूंचे वाटप
तळोदा येथिल आंबेडकरी अनुयायांचा निर्णय
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथिल आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुमारे ११० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आले.
तळोदा येथिल नोकरदार असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.जयंतीनिमित्ताने व्याख्यान,परिसंवाद,भीमगीतगायन,कीर्तन, जलसा यांसारखे प्रबोधनाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील अशा स्वरूपातील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांचे नियोजन प्राथमिक पातळीवर सुरू होते.मात्र परंतु कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करता येणे शक्य नसल्याने या वर्षीच्या जयंती उत्सवाच्या खर्चातून समाजोपयोगी उपक्रम राबवून कृतिशील अभिवादन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार बुडाल्यानें त्याचे कुटुंब मोठ्या आर्थिक विवनचनेला सामोरे जात आहे.त्यामुळे या वर्षीच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथिल आंबेडकरी अनुयायांनी अश्या गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आज दि १३ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तळोद्यातील ११० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता घरपोच वाटप करण्यात आले.
तळोदा येथिल फुले शाहू आंबेडकर विचारमंच व अंनिसचे कार्यकर्ते एड राजेंद्र इंदिस,डॉ किशोर सामुद्रे,मुकेश कापुरे, संतोष केदार,हंसराज महाले, सुनील पिंळले,अमोल पाटोळे,रवि आगळे,प्रणित धारगावे,महेंद्र सामुद्रे,प्रा राजू यशोद,राहूल जावरे,सुनील खैरनार,विनोद बोरसे,अनिल पवार,पप्पू साळवे,सोनू नरभवर यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूचे पाकिटे तयार करून गरजू कुटुंबाना वितरीत केले.या उपक्रमासाठी तळोदा येथिल सर्व आंबडेकरी अनुयायांसह सार्वजनिक जयंती उत्सव समिती,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,ब्लु टायगर बाईज,लहुजी वस्ताद ग्रूप,राष्ट्रीय छात्र सेना,चर्मकार नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
फोटो : तळोदा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून गरजू कुटुंबांना वाटप करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटे तयार करतांना कार्यकर्ते....
Comments
Post a Comment