14 दिवसानंतर घरी परतणाऱ्यांचे वाढविले मनोबल
तळोदा: तालुक्यातील आमलाड येथे तयार करण्यात आलेल्या विलगिकर कक्षातुन 14 दिवसानंतर घरी जाण्याची परवानगी दिली.घरी सोडताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी टाळ्या वाजवून त्याला सलामी दिली.
कोरोनाग्रस्त भागातून आलेल्या ९ जणांना आरोग्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तळोदा तालुक्यातील आमलाड येथील विलगिकरण कक्षात निगराणीत ठेवले होते.त्यापैकी आजपर्यंत ४ व्यक्तींना घरी सोडण्यात आलेआहे तर ५ जण अद्याप विलीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
14 दिवसानंतर शनिवारी आज सकाळी ९ वाजता आरोग्य विभागाच्या परवानगीने एका तरुणास घरी पाठवण्यात आले. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी रुग्णालयातून बाहेर पडताच तेथील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना सलामी दिली.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment