महाराष्ट्राचा सीमेवर कोरोना प्रशासन सतर्क

तळोदा:- महाराष्ट्र्र हद्दीला लागून असलेल्या गुजरात राज्यातील शेलांबा गावात एक  वयस्क नागरिकांस कोरोना  संक्रमण आढळून आले असल्याने गुजरात सीमेवर असणाऱ्या अक्कलकुवा व खापर गावात खबरदारी  घेतली जात आहे, तर खापर गावात देखील सतर्कता बाळगली जात आहे.
                महाराष्ट्र राज्याच्या लागून असलेल्या नर्मदा जिल्हात दोन रुग्ण आढळले असून आता महाराष्ट्र गुजरात राज्याचा सीमेवर असणारे सेलांबा हे गाव गुजरात राज्यात असले तरी अवघे १३ की,मी, खापर गाव पासून असल्याने या ठिकाणी नियमित पणे विविध कारणाने लोक ये जा करत असतात शेलांबा हे व्यपारी दृष्टीकोनातून सीमेवरील एक मोठं केंद्र समजलं जातं त्यामुळे खापर इथून अनेक छोटे मोठे व्यपारी ये जा करत असतात , त्यामुळे आता खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क झालं असून  तपासणी नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त असला आहे व आरोग्य यंत्रणा देखील सतर्कता बाळगत आहे,
            दरम्यान  यापूर्वी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागातील सर्व  सीमा बंद करण्यात आल्या आहेत, आता मात्र गुजरात राज्यातील महाराष्ट्र्र सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यात देखील कोरोना  रुग्ण आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्या प्रशासन सतर्क झाले आहे दरम्यान या बाबत  अक्कलकुवा तहसीलदार
गवालीी तपासणी नाका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेजारील  गुजरात  राज्यातील महाराष्ट्र   सीमेलगत असणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यात प्रवेश करणारे सर्वच रस्ते अगोदर पासून  बंद असले तरी आता ग्रामसुरक्षा माध्यमातून अधिक मनुष्यबळ तिथं उभे करून  कडक  बंदोबस्त ठेवण्यात  आला आहे, दरम्यान खापर ग्राम पंचायत च्या माध्यमातून तीन दिवस पूर्णपणे सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
               तळोदा तालुक्यातील राज्यसिमा चेकपोस्ट डोडवे येथे भेट देऊन पाहणी करतांना गटविकास अधिकारी, सावित्री खर्डे संजय पाटील,विअ.(आरोग्य) यांनी भेट दिली. चेकपोस्ट सुविधा बाबत पथकाशी चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी