शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

कालीचरण सूर्यवंशी


   तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघात विद्यमान आमदार राजेश पाडवी तर काँगेस कडून राजेंद्र गावित अशी सरळ लढत असल्याने काट्याची टक्कर समजली जात आहे. मात्र मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीचां अनुभव पाहता तिरंगी तसेच अपक्ष अशी झालेली आहे त्यामुळं कोण किती आणि कोणत्या उमेदवाराचे मत घेतात यावर निकाल ठरत होता मात्र मात्र यंदा एक अपक्ष वगळता हि लढत सरळ झालेली आहे. त्यामुळं निकालाचा दिवशी काय निकाल येतो या कडे उत्सुकता वाढली आहे .


  •  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ झालेले मतदान             
एकूण पुरुष मतदार -१७५०४३
एकूण स्त्री मतदार - १७७५८८    
एकूण इतर मतदार -५
एकूण मतदार -३५२६३६

  •  झालेले मतदान
पुरुष मतदार - १२१९५१
स्त्री मतदार - १२१४०८  
इतर मतदार - ३
एकूण एकंदर झालेले मतदान २४३३६२ - (६९.0१%)


  • लोकसभेत काँगेस आघाडीवर -
    २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप चां डॉ हिना गावित या शहादा तळोदा मतदार संघात एकूण ४६ हजार पेक्षा अधिक मतांनी मागे होत्या.याचा अर्थ भाजपचे राजेश पाडवी यांना इतका लीड तोडून जिंकावे लागणार आहे. अर्थात त्या दृष्टीने राजेश पाडवी यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
        राजेश पाडवी यांचे स्वतचं वलय - आमदार झाल्या नंतर राजेश पाडवी यांनी स्वतचं त्यांचा दिवंगत मातोश्री स्व.कलावती संस्थेचा माध्यमातून त्यांचा मतदार संघात कोणीही मृत झाल्यास त्यांना आर्थिक मदत तसेच अन्नदान स्वतः करणे तसेच कोविड काळात पर राज्यात अडकेलेले मजूर स्वतःआर्थिक भार उचलून स्वगृही घेऊन येणे तसेच असाध्य आजार साठी मुंबई,पुणे,नाशिक अश्या ठिकाणी रुग्णाला नेणे व स्वतः भार उचलणे.सोबतच प्रत्येक छोट्या मोठ्या गावात पाड्यात जाऊन भेटणे तसेच कार्यक्रममध्ये उपस्थित रहाणे हि त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. तर काँगेस चे राजेंद्र गावित यांचा साठी काँगेस च चिन्ह याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.

  • माजी आमदार उदेसींग पाडवी यांची एन्ट्री की पॉइंट -
  राजेश पाडवी यांचे पिता माजी आमदार उदेसींग पाडवी यांच्यात वितूष्ट होते मात्र मतदानाचा काही दिवसापूर्वी काँगेस ने तिकीट न दिल्याने त्यानी पुत्राला पाठिंबा दिल्याने त्यांचा दांडगा अनुभव याचा फायदा राजेश पाडवी यांना होत असल्याचे सांगितले जात आहे.

  • नवमतदार निर्णायक ?
शहादा तळोदा एकूण १७ हजार नव मतदार वाढले आहेत त्यामुळं 
 हे मत कोणत्या उमेदवाराचा बाजूने जातात हे देखील महत्वाचे असेल .


  • काँग्रेसला लोकसभा सारखे निकाल अपेक्षित -
   काँगेस पक्षाला नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतधीक्य. विधानसभेत देखील मिळेल अशी अपेक्षा काँगेस कार्यकर्त्यांना आहे.एकंदरीत लढत जोरदार झाली असली तरी अखेरचा टप्प्यात भाजप पेक्षा स्वतः राजेश पाडवी यांचा व्यक्तिगत प्रचार कार्यकर्ते कडून झाल्याने त्याचा किती फरक पडतो हे उद्या निकाल अंती समोर येईल त्यामुळं हि राजकीय लढाई काँगेस विरुद्ध राजेश पाडवी अशी झालेली दिसते .


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल -  
उदेसिंग कोचरू पाडवी (भाजपा) ५८५५६, 
पद्माकर विजयसिंग वळवी काँग्रेस ५७८३७ 
राजेंद्रकुमार कृष्णराव गावित राष्ट्रवादी काँगेस ४६९६६ 
सुरेश सुमेरसिंग नाईक शिवसेना ६६४५ 
किसन रुंजा पवार मनसे ४५१०
उदेसींग पाडवी ७१९ इतक्या कमी फरकाने जिंकले होते

  • विधानसभा निवडणूक २०१९ निकाल -
राजेश उदेसिंग पाडवी भाजप ९४९३१ 
ॲड पदमाकर विजयसिंग वळवी काँग्रेस ८६९४०
जेलसिंग बिजला पावरा अपक्ष २१०१३ 
जयसिंग देवचंद माळी सीपीआयएम ४०६० 
राजेश पाडवी ७9९१ इतक्या मतांनी विजयी झाले होते.

Comments

  1. Good इन्फॉर्मेशन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?