शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान
शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान
तर तळोदा शहरात किती झाले मतदान?
तळोदा : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे असणाऱ्या शहादा तळोदा मतदारसंघात एकूण 69.01% मतदान झाले आहे. शहादा तळोदा मतदारसंघात एकूण तीन लाख 52 हजार 636 एवढे मतदार होते. त्यापैकी दोन लाख 43 हजार 365 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहादा तालुका मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाडवी हे निवडणूक लढत होते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस तर्फे राजेंद्रकुमार गावित हे निवडणूक लढवत होते याशिवाय एक अपक्ष उमेदवाराचा देखील या मतदारसंघात समावेश होता. मात्र सरळ लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती.
तळोदा तळोदा शहरात सकाळपासूनच मतदारांचा उत्साहात दिसून येत होता तळोदा शहरात एकूण 25 मतदान होत होती. विधानसभा मतदार संघातील यादीनुसार तळोदा शहरातील 25 मतदान बुथवर एकूण 26340 एवढे मत तर होते त्यापैकी 16619 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
तळोदा शहरात बुथनिहाय झालेली मतदानाची संख्या व मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
शहादा-तळोदा मतदार संघात एकूण 366 मतदान केंद्र होती तर मतदारांची संख्या एकूण तीन लाख 52 हजार 636 एवढी होती यात एक लाख 75 हजार 43 पुरुष तर एक लाख 77 हजार 588 स्त्रियांचा समावेश होता तर अन्य 5 पाच मतदार होते.
शहादा-तळोदा मतदार संघात एकूण 121951 पुरुषांनी तर ,121408 महिला मतदार तर 3 अन्य मतदारानी मतदान केले.
Sajah
ReplyDeleteSahadat Arora
Delete