पाच मतदान केंद्रावर एक दिवस अगोदरच पोहोचले कर्मचारी
तळोदा: अक्कलकुवा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात नर्मदा नदीच्या काठापलीकडे वसलेल्या पाच मतदान केंद्रावर पाच मतदान पथके सोमवारी रवाना करण्यात आली. बार्जच्या सहाय्याने ही मतदान पथके मतदान बुथवर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारात पोहोचली.
      या मतदान केंद्रामध्ये मनीबेली,चीमलखेडी, बामणी, डनेल,मुखडी या पाच केंद्रांच्या समावेश आहे. या केंद्रांसाठी सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अक्कलकुवा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून रवाना झाली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातून या पथकांच्या पाच गाड्यांना हिरव्या झेंड्या दाखवून रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात चार कर्मचारी समाविष्ट असून त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास ही वाहने नर्मदा काठावर वसलेल्या मनीबेली गावापर्यंत जीपने पोहचली. तेथून पुढील प्रवास त्यांनी बार्जच्या सहाय्याने केला.
        या पाचही पथकांसोबत मतदान बॅलेट युनिट,कंट्रोल युनिट,व्हीव्हीपॅड, आवश्यक मतदान स्टेशनरी,प्राथमिक आरोग्य कीट, असे साहित्य वितरित करण्यात आले आहे. हि मतदान केंद्र नर्मदा काठी अतिदुगम ठिकाणी असल्याने मतदानाची वेळ सकाळी 07-00 ते दुपारी 3-00 वा. पर्यंत असणार आहे.





Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?