तळोदा शहरातील 5 हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय पोषण आहार

तळोदा:(सुधाकर मराठे) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ शहरी भागातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषस शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय यांचा समावेश असून तळोदा शहरात जिल्हा परिषद व खाजगी अश्या 14 शाळा असून 5 विद्यार्थी शापोआ वितरीत होणार आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा साथ रोग कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली तरतुदी नुसार सक्षम प्रधिकरण यांच्या मान्यतेने व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात दिनांक ३ मे पर्यन्त संपूर्ण देशात लोकडाउन असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व लहान बालके पोषण आहार पासून वंचित राहत असल्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुमुटो रिट याचिका दाखल झांल्यानंतर त्या दृष्टीने लहान बालके व विद्यार्थी यांना पोषण आहार देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शहरी भ...