गुजरात राज्यातून ९०० मजूर परतले
- Get link
- X
- Other Apps
प्रतिनिधी तळोदा
गुजरात राज्यातील तब्बल ९०० ऊस तोडमजूर मढि जिल्हा तापी इथून काही खाजगी टेंपोने गुजरात राज्याची सीमा ओलांडून निझर मार्गे महाराष्ट्र्रात दाखल झाले असून सदर मजूर प्रकाशा इथं पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासन ला कळल्या नंतर तात्काळ प्रशासन च्या हालचाली गतिमान झाल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली, तसेच त्यांना शहादा इथं न नेता सरळ तळोदा तालुक्यातील आमलाड विलगिकरण कक्ष कडे नेण्यात आले या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडण्यात आले,
दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणी साठी सह कुटुंब हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात, यंदा देखील असेच शहादा तालुक्यातील व तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते, मात्र गुजरात राज्याने त्यांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी त्यांना गुजरात राज्याने उन्हा तान्हात कोणतेही सोय न करता पाठविले आहे ,
शहादा तालुक्यातील सिंध दिगर,तोरणमाळ, कुंडी पाळा , खडकी , झापी फलाई कुंड्या भाद्दल ,जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत ,
गुजरात राज्यसरकार ने इतका मोठा निर्णय घेतांना जिल्हा प्रशासन ला कोणतीही चर्चा केली नव्हती का ? हा शोधाचा विषय आहे,
दरम्यान सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना होम कोरोन्टीन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले,
आमलाड विलगिकरण कक्षात त्यांची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, डॉ,विशाल चोधरी, श्री मती एस,एस,वळवी, श्रीमती इरला गवळी,श्रीमती लीला साळवे, श्रीमती सुनंदा चोरे या आरोग्य सेविका, आरोग्य सहायक डी,बी,गवळी, आरोग्य सेवक जी,बी, बोरसे , मनोज पिंजारी,राहुल मालकर, विकास सुसर, आरोग्य सेवक हे तपासणी करत आहेत,
चॉकट -
गुजरात राज्यातून निझर मार्गे येणारे या मजुरांना प्रकाशा इथून शहादा रुग्णलयात घेऊन न जाता आमलाड इथं का आणन्यात आले, हा शोधाचा विषय आहे वास्तविक सर्व मजूर हे तोरणमाळ परिसरात राहणारे असतांना त्यांना सोयीची जागा शहादा होती तप्त उन्हात मात्र त्यांना उगाच त्रास सहन करावा लागला,
चॉकट -
९०० रुग्ण करिता अतिशय कमी डॉक्टर आमलाड इथं उपलब्द असल्याने त्यांना दिवसभर उभं राहून वैद्यकीय तपासणी करावी लागली ,
सकाळी १९० लोक सुरुवातिला आलीत नंतर परत ९०० लोक आलीत म्हणून जेवण, चहा काहीही न घेता दिवसभर डॉक्टर उभ्यानेच उपाशी पोटी तपासणी करत होते
सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली असून कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी सांगितले,
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment