धनपूर येथे डेंग्यू सदृश रुग्ण सापडला; प्रशासन सज्ज
तळोदा: (सुधाकर मराठे)तालुक्यातील धनपूर येथील 28 वर्षीय युवक डेंग्यू सदृश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत मार्फत सतर्कता बाळगण्यात आली असून गावात धुरळणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत असून गावातून 10 रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
धनपूर येथील 28 वर्षीय युवकास गेल्या चार पाच दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू लागल्याने त्याला प्रतापपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखविण्यात आले. दरम्यान याठिकाणी विविध तपासण्या केल्यानंतर तो युवक डेंग्यू सदृश असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान धनपूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग विभागा सतर्क आहे, अपुरे मनुष्यबळ असले तरी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेवेकऱ्यासमोर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तालुका आरोग्य विभागाकडून धनपूर गावात जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याबरोबरच कोरोना सोबतच आता डेंग्युविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, प्रतापपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक, एन बी वळवी आरोग्य सेवक, एन एस तुपे, आरोग्य सेविका एल सी. पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मांगीलाल पावरा, आरोग्य सेविका श्रीमती .जे .एम.पाडवी, सी. एल. पावरा,एस एस वळवी, भुलाबाई पाडवीए.आर. गावित आरोग्य सेवक एस. डी. जाधव वि. डी. मोघे,आशा कार्यकर्ती, कविता धानका आरोग्य सहाय्यक डी. बी. पावरा, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे 7 पथके तयार करण्यात आली असून परिसरात सर्वेक्षण करून रक्त नमुने घेत आहेत.. त्या युवकांच्या कुटूंबातील 7 जनांचे व इतर 3 असे एकूण 10 जनांचे रक्ताचे नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान या युवकास डेंग्युची लागण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात धुरळणीची व्यवस्था करण्यात आली असून, तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, आदी लक्षणे असल्यास गावातील आरोग्य कर्मचारी किंवा प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासून उपचार करून घ्यावे, त्याचप्रमाणे लोकांनी स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे........
Comments
Post a Comment